
यवतमाळ जिल्ह्यातील काळी ते दिग्रस मार्गावर वसंतनगर येथील पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा नादात दोन तरुण वाहून गेले. ज्ञानेश्वर जाधव (वय 28), सुरेश महिंद्रे (वय 27) अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावं आहेत. ते महागाव तालुक्यातील साई ईजारा गावचे रहिवासी आहेत.
पावसामुळे वसंतनगर येथील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्या पाण्यातून दुचाकी (एमएच 29 एव्ही 0074) काढण्याच्या प्रयत्नात दोन्ही तरुण वाहुन गेले.याबाबत दिग्रस पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांना माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. ज्ञानेश्वर जाधव याचा मृतदेह मिळाला. मात्र सुरेश महिंद्रे याचा मृतदेह सापडलेला नाही, त्यामुळे शोधकार्य अजूनही सुरू आहे.


























































