बुधवारपर्यंत अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, विदर्भात पावसाचा जोर वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणोशोत्सवाच्या मुहुर्तावर वरुणराजाने संपुर्ण राज्याला झोडपून काढले. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे गेल्या 24 तासांत बहुतांश भागात मुसळधार पडला. येत्या बुधवारपर्यंत राज्यभरात मुंबई, ठाण्यासह विविध जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला तसेच मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, कोकण, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई तसेच ठाणे या जिह्यांना 27 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

– कुलाबा येथे 21 मिमी तर सांताक्रुझ येथे 16 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
– आज मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते. तुरळ पाऊस पडला. ठाणे जिह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.