सोमनाथ मंदिरातील पुजारी राहुल गांधींना ओरडले, आदित्यनाथ यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमनाथ मंदिरात दर्शनाला गेले असताना नमाज पढायला बसतात तसे बसले होते असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. मंदिरात नीट न बसल्याने मंदिरातील पुजारी त्यांना ओरडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अहमदाबादमध्ये भाजपने एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती. भाषणादरम्यान त्यांनी राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंदिरांना दिलेल्या भेटीची उपस्थितांना आठवण करून दिली. या मंदीर भेटीदरम्यान सोमनात मंदिरात तिथले पुजारी राहुल गांधी यांना मांडी घालून न बसल्याने ओरडले होते असं आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे. ‘नक्कल करण्यासाठीही अक्कल लागते’ असा टोमणाही आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांना लगावला.