
वाहनाला मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोहंमद शाहिद रझा अन्सारी असे मृताचे नाव आहे. तर निसार अली अन्सारी हा गंभीर जखमी झाला आहे. पीटर मोईनुद्दीन रविवारी सायंकाळी बीकेसीच्या नाबार्ड येथील सिग्नल येथे उभे होते. सिग्नल सुटल्यावर ते बीकेसी कनेक्टरचा वापर करून चेंबूर येथे जात होते. तेव्हा रझा आणि निसार हे दोघे मोटारसायकलवरून वांद्रेच्या दिशेला जात होते. मोहंमदची मोटारसायकल पीटर याच्या वाहनाला धडकली. पीटर याचे वाहन डिव्हायडरला जाऊन धडकले. त्यात पीटर हे जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच बीकेसी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी मोहंमद शाहिद आणि निसारला शीव रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मोहंमद शाहिदला मृत घोषित केले. तर जखमी निसारवर उपचार सुरू आहे.


























































