
जालना – संभाजीनगर महामार्ग रस्त्यावर व बदनापूर तालुक्यातील देवगाव फाट्याजवळ एका युवकाचे प्रेत सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ माजली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे, दरम्यान त्या युवकाची ओळख पटली असून शेख फय्याज शेख राईस (22) रा. जालना असे मयत युवकाचे नाव आहे.
जालना-संभाजीनगर महामार्ग रस्त्यावरील बदनापूरपासून तीन किलो मीटर अंतरावर देवगाव फाट्याजवळ एका खासगी प्लॉटिंगमध्ये रोडपासून 60 फुटाच्या अंतरावर 13 फेबूर्वरी रोजी सकाळी एका युवकाचे मृत अवस्थेत प्रेत आढळून आले, प्रेताच्या बाजूला रक्तदेखील पडलेले होते तर शरीरावर तीक्ष्ण हत्याराने घाव केल्याच्या 7 ते 8 खुणा दिसून आल्या. गळ्यावर व छातीवर तीष्ण हत्याराने वार केलेले आहेत. या घटनेची माहिती नागरिकांनी बदनापूर पोलिसांना माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड, जमादार सय्यद अफसर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. प्रेताची अजून ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचे फोटो घेऊन प्रेत शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील
ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
तरुणाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर तरुणाचे नातेवाईक जालना येथे आले. तेव्हा शेख फय्याज शेख रईस या तरुणाची ओळख पटली. मृत तरुण सेंट्रिंगचे काम करीत होता. जालना येथील रोजबाग दर्गा परिसरातील शेख फय्याज हा त्याच्या मोठ्या भावासोबत विविध बांधकामावर सेंट्रिंगचे काम करीत होता. त्याचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते, तरीही ही घटना कशी घडली, माहित नाही, अशी माहिती मृत तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे.

























































