अकोला दंगल : मुंबईत शिकणाऱ्या अरबाझला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोला दंगलप्रकरणी पोलिसांनी अरबाझ खान या तरुणाला अटक केली आहे. तो मोहता मिल भागात राहणारा असून मुंबईत व्हीएफएक्सचे शिक्षण घेत आहे. त्याने इन्स्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट व्हायरल करून जमाव गोळा केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी गंगानगरमधील एका व्यक्तीलाही अटक केली असून त्यानेही इन्स्टाग्रामवरून चॅट व्हायरल केल्याचा आरोप आहे. अरबाझ हाच या प्रकरणातील मुख्य तक्रारदार होता; मात्र तक्रार दाखल करून तो फरार झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.