युवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात

74

सामना प्रतिनिधी । कुडाळ

शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी पास प्रश्नी शनिवारी युवासेनेने एसटी आगारात धडक देत प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर एस.टी प्रशासनाने कुडाळ आगारात विद्यार्थ्यांना पूर्ववत कागदी एस.टी पास देण्याचे मान्य केल्याची माहीती युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर व अनंत पाटकर यांनी दिली.

गेले 10 दिवस कुडाळ एसटी आगारात कुडाळात तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदी पास ऐवजी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करून मासिक एसटी पास म्हणून स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात आली होते. मात्र पास संपला तरी स्मार्ट कार्ड उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूळ तिकीटाची रक्कम भरून प्रवास करावा लागत होता. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तालुका व जिल्हाभरातील विध्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसून विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. संबंधित विषयाची दखल घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी याबाबत युवसेनेचे जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, जिल्हाप्रमुख गीतेश कडू व आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर यांच्याजवळ कैफियत मांडली. युवासेनेने याची त्वरित दखल घेऊन कुडाळ आगारात धाव घेत सहाय्यक आगार व्यवस्थापक रोहिणी पाटील व लांबोर यांना याबाबत जाब विचारला. तसेच गितेश कडू, अनंत पाटकर यांनी कणकवली एसटी विभाग नियंत्रक कार्यालयात भेट देऊन विभागीय वाहतूक अधिकारी पाटील यांची भेट घेतली व याबाबत विचारणा केली. यांनतर पाटील यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक यांना जोपर्यत स्मार्ट कार्ड उपलब्ध होत नाहीत तोपर्यत कागदी एसटी पास देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार विध्यार्थ्यांना कागदी पास देण्यास कुडाळ आगारात सुरवात करण्यात आली आहे अशी माहीती युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर व अनंत पाटकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या