उज्ज्वल निकम यांनीच उघड केला भाजपचा ढोंगीपणा, भर टीव्हीशो मध्ये स्व:पक्षाचेच काढले वाभाडे

उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वकिलीत मुरलेले खिलाडी असलेले उज्वल निकम हे राजकारणात मात्र नवखे असल्याने त्यांचा सध्या गोंधळ उडताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार एबीपी माझ्याला मुलाखत देताना घडला. उज्ज्वल निकम यांनी चक्क बोलण्याच्या ओघात थेट स्वपक्षावरच म्हणजे भाजपवर टीका केली.

उज्जल निकम यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या केसमध्ये सरकारी वकील म्हणून बाजू मांडली होती. त्यावेळी कसाबला मटन बिर्याणी दिल्याची फार चर्चा झाली होती. त्यावरून तत्कालिन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. आता भाजपनेच उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.उज्ज्व निकम यांनी नुकतीच एबीपीला माझाला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना कसाबच्या बिर्याणीवरून प्रश्न विचारण्यात आला यावेळी त्यांनी त्यावेळी घडलेली सत्य परिस्थिती सांगितली. ती सांगतानाच तत्कालिन विरोधी पक्षाने चक्क अकलेचे तारे तोडले असे ते म्हणाले.

यावेळी उज्ज्वल निकम म्हणाले की, मी कोर्टात फक्त विचारलं की कसाबने बिर्याणी मागितली? माझ्या त्या प्रश्नाला मीडियाने हेडलाईन बनवून चालवलं. त्यावेळचे तत्कालिन विरोधक नेते होते त्यांनी थेट कसाबला सरकारने मटण बिर्याणी देत आहेत असे आरोप केले”,

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या सोशल मीडियावरून कसाबला बिर्याणी दिल्याचा आरोप करणारा योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ आणि उज्ज्वल निकम यांचा याबाबतच्या खुलाशाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच भाजपवर टीका देखील केली आहे. ”कसाबला बिर्याणी दिली जात असल्याचे रेटून खोटे आरोप भाजपने केले होते. आता मात्र त्याच भाजपचं पितळ हे त्यांचेच लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांनी उघडं पाडलंय. अशा ढोंगीपणाने स्वार्थी डाव साधणा-या भाजपला सत्तेतून खाली उतरवूयात, आता भाजविरोधात मतदान करूयात, अशी पोस्ट राष्ट्रवादीने शेअर केली आहे.,