‘मी स्वतःला माल म्हणू शकेन, असं मला वाटत नाही’; ‘हीरामंडी’च्या फरीदनने सांगितलं कारण

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वेब सिरीज ‘हीरामंडी’ 1 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाली आहे. या वेब सिरीजमध्ये मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, आदिती राव हैदरी, शेखर सुमन यांसारखे अनेक कलाकारांनी काम केले आहे. या वेब सिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा देखील आहे. सोनाक्षीने या वेब सिरीजमध्ये दुहेरी भूमिका साकारली आहे. पहिले पात्र रेहानाचे आणि दुसरे फरीदनचे. या वेब सिरीजमुळे सोनाक्षी सध्या चर्चेत आहे. दरम्यान, झूमला दिलेल्या मुलाखतीत तिने जुन्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांबद्दल आणि चित्रपटांच्या निवडीबद्दल भाष्य केले आहे.

“एक कलाकार म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे. लोकांचं लक्ष तुमच्याकडे असतं. त्यामुळे उत्तम काम करणं गरजेचं आहे. लहान असताना अनेक मोठे चित्रपट करण्याची संधी मला मिळाली. तो काळ असा होता की त्या चित्रपटांना कोणीही नाही म्हणू शकत नव्हते. पण, नंतर मला समजले की जेव्हा तुम्ही मोठे होता, तुम्हाला कामात यश मिळते तेव्हा लोक तुम्हाला पाहतात. तुमच्या कामाबाबत बोललं जातं, त्यावर चर्चा केली जाते. काही वेळा टीका होते. तर काही वेळा चांगलं देखील बोललं जातं, असे सोनाक्षी यावेळी म्हणाली.

‘अकिरा’ चित्रपटानंतर ज्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यामुळे मला वेगवेळ्या भूमिका साकारायची संधी मिळाली. माझ्यात खूप बदल झाले आहेत. यावर लोक अनेकदा कमेंट्स करतात. मी फक्त या गोष्टी सांगत नाहीये. पण त्यामुळे मी स्वत:ला माल म्हणू शकत नाही. हा प्रत्येकाचा दृष्टीकोण आहे. मात्र आपण स्वत:ला नेहमी चांगलंच म्हणायचं. हे एक पाऊल आहे. जे प्रत्येकाने उचलले पाहिजे, असेही ती म्हणाले.

सोनाक्षी सिन्हाने 2010 मध्ये ‘दबंग’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘राजकुमार’, ‘राउडी राठौर’, ‘सन ऑफ सरदार’ आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘हीरामंडी’पूर्वी ती अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट फ्लॉप झाला.