अमेरिकेतील अलास्का राज्यातील अँकरेज शहराच्या महापौरांची बेघरांसाठी मोठी योजना

अलास्का राज्यातील अँकरेज शहराचे महापौर डेव ब्रोन्सोन यांनी आगामी थंडीच्या मोसमासाठी एका नव्या योजनेचा प्रस्ताव मांडला आहे.  अँकरेजसारख्या छोट्याशा शहरात मर्यादित क्षेत्रफळामुळे अनेक बेघर कुटुंबांची गोची होते. जीवघेण्या थंडीत त्यांच्याकडे निवाराच नसतो. या पार्श्वभूमीवर महापौर ब्रोन्सोन यांनी एक वेगळीच योजना मांडली आहे अशा निर्वासितांना दुसऱ्या उबदार शहरांत हलविण्यासाठी त्यांना मोफत एकेरी विमान प्रवासाची सोय करून देण्याची योजना आखली आहे. जेणेकरून त्यांची थंडी उबदार होईल.

 ब्रॉन्सन म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत आमच्या शहराने बेघरांवर 161 दशलक्ष डॉलर्स  खर्च केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी त्यांच्या शहरात आठजणांचा मृत्यू बेघर म्हणून रस्त्यावर झाला होता. त्यांनी नमूद केले की या शहरात राज्याच्या लोकसंख्येच्या 40% आणि राज्यातील 65% बेघर लोक आहेत.