विमानतळावरून कासवे केली जप्त

 

 माशाच्या नावाखाली कासवे, गोगलगायची तस्करीचा प्रकार महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) हाणून पाडला आहे. डीआरआयने कारवाई करून कासवे, गोगलगाय, खेकडे जप्त केले आहेत. थायलंड येथून मुंबई विमानतळाच्या कार्गो येथे एक पार्सल येणार आहे. त्या पार्सलमध्ये शोभिवंत मासे असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानुसार ते पार्सल तपासले. त्यात 162 कासवे, 110 गोगलगाय, 30 लहान खेकडे आणि 4 स्टिंग रे मासे होते. ही कासवे, गोगलगाय आणि खेकडे हे थायलंड येथून मुंबईत पाठवण्यात आली होती.