
नावाचा फायदा घेऊन गेल्या अठरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱया आरोपीला अखेर दिंडोशी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. तबरेज अजीम खान ऊर्फ मन्सुरी असे त्याचे नाव आहे. 1992च्या दंगलीत तबरेजविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
1992 साली मुंबईत दंगली झाल्या होत्या. दिंडोशी पोलीस ठाण्यात दत्तात्रय कदम याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुह्यात पोलिसांनी एकूण 9 जणांविरोधात सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायालयाने त्या गुह्यात दोघांना निर्दोष मुक्त केले होते. तर एका आरोपीचा मृत्यू झाला होता. या गुह्यात सहा आरोपी हे न्यायालयात हजर न राहिल्याने 2004 साली त्याना फरार घोषित केले होते. त्यात तबरेजचादेखील समावेश होता. क्रमांक आठचा आरोपी असलेला तबरेज हा दिंडोशी परिसरात राहत असल्याची माहिती उपनिरीक्षक नितीन सवणे यांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळल्यानंतर पोलिसांनी तबरेजला ताब्यात घेऊन अटक केली.































































