
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शेतात कापूस काढत असताना वाघाने हल्ला करत ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील सावली तालुक्यातील ही घटना असून स्वरूपा येलटीवार (50) असे मृतकचे नाव असून ती खेडी गावची रहवाशी आहे. दोन दिवसात तीन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी केली आहे



























































