शिवक्रांती कामगार संघटनेचा मेळावा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवक्रांती कामगार संघटनेचा 25वा कामगार मेळावा नुकताच लोणावळा येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. या कामगार मेळाव्याला भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी मार्गदर्शन करताना कामगारांवर कोणतेही संकट, अडचण येईल तेव्हा मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढेन, अशी ग्वाही दिली.

सर्वसामान्य कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. ज्या ठिकाणी कामगारांवर अन्याय झाल्याचे दिसते तेथे कशाचीही पर्वा न करता आपण संघर्ष केला आहे. त्यामुळेच विजय पालेकर यांनी मला या मेळाव्याला उपस्थित राहून कर्मचाऱयांना आत्मविश्वास देण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत आज मी या मेळाव्याला उपस्थित राहून संघटनेचे पालकत्व घेतल्याचे दरेकर यांनी सांगितले.