
आचार्य अत्रे यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 13 ऑगस्ट 2023 ते 13 ऑगस्ट 2024 या कालावधीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे हे कार्यक्रम होणार आहेत.
नुकतीच आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान विशेष सभा शिवाजी पार्क येथील साने गुरुजी विद्यालयात झाली. या सभेत आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे औचित्य साधून समिती गठीत करण्यात आली. समितीत राम नाईक, पंडित वसंतराव गाडगीळ, डॉ. सोमनाथ कोमरपंत, राजेंद्र पै, हर्षवर्धन देशपांडे, अक्षय पै, ऍड. बाबूराव कानडे चंद्रशेखर वझे, रवींद्र आवटी, शिबानी जोशी, सुरेंद्रभाऊ शंकर शेठ आदी मान्यवरांचा समावेश आहे. समितीच्या कार्यवाहपदी रवींद्र आवटी यांची तर कोषाध्यक्षपदी चंद्रशेखर वझे यांची यावेळी निवड करण्यात आली. आचार्य अत्रे यांचे मुंबईत भव्य स्मारक असावे, यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव विशेष सभेत करण्यात आला. यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ यांनी आचार्य अत्रे विश्वविद्यालयाची कल्पना सविस्तरपणे मांडली तसेच सर्व जिह्यात तसेच सरकारने आचार्य अत्रे यांची जयंती साजरी करण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

























































