गेल्या चार वर्षात रोजगार निर्मितीत 13 टक्क्यांनी वाढ – सर्वेक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या चार वर्षात देशात 3 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती झाली आहे. को फेडेरशेश ऑफ इंडिया या संस्थेच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. मध्यम व लघुउद्योगातून ही रोजगार निर्मिती झाली असून त्याचे प्रमाण 13 टक्के इतके असल्याचे या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे असून त्यानंतर गुजरात आणि तेलंगणाचा क्रमांक लागतो.

या सर्वेक्षणात एक लाखहून अधिक उद्योग संस्था, 350 उद्योग क्षेत्र असून 28 राज्यात हे सर्वेक्षण केले गेले. रोजगारनिर्मितीत दरवर्षी 3.3 टक्के वाढ हो असल्याची माहिती को फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी दिली. रोजगारनिर्मितीमध्ये हॉस्पिटल आणि पर्यटन या उद्योगांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर वस्त्रोद्योग आणि लोह उद्योगाचा क्रमांक लागतो.

गेल्या चार वर्षात लघु उद्योग संस्थ निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या चार वर्षात 89 हजार 897 सुक्ष्म, 14 हजार 382 लघू आणि  1हजार 368 मध्यम उद्योग संस्था नव्याने सुरू झाल्याचे सर्वेक्षणातू समोर आले आहे.