
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशमध्ये उष्माघाताने 15 माकडांचा बळी गेला आहे. सदर माकडं देवासमधील जोशी बाबा जंगलातीत आहेत. जंगलमध्ये माकडांचीही मक्तेदारी पहायला मिळत आहे. एका माकडांचा समूह दुसर्या माकडांना तलावातील पाणी पिण्यासाठी मज्जाव करताना दिसत आहे.
मृत माकडांपैकी काही माकडांचा मृत्यू हा इन्फेक्शनने झाला असावा अंदाज वन अधिकार्यांनी केला आहे. एका माकडांचा मोठा समूह इतर माकडांना पाणी पिऊ देत नाही. त्यामुळे काही माकडांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा वन अधिकारी पीएन मिश्रा यांनी दिली.
जंगलात अधिक पाण्याची सोय सरकारतर्फे केली असून मृत माकडांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
























































