
देशातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्पह्ट घडविण्याचा कट रचणारी दहशतवादी संघटना ‘इसिस’विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) धडक कारवाई सुरू केली आहे. आज पुणे, ठाणे, भिवंडीसह 44 ठिकाणी ‘एनआयए’च्या पथकांनी छापे टाकले. यावेळी संशयित दहशतवाद्यांची धरपकड सुरू केली असून 15 जणांना अटक केली आहे.
‘एनआयए’बरोबरच या कारवाईत राज्य दहशतवादविरोधी पथकही (एटीएस) सहभागी झाले होते. काही महिन्यांपूर्वी पुण्यात एनआयएने ‘इसिस’च्या दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांनी तोंड उघडल्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरात पसरलेले इसिसचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी ‘एनआयए’ने धडक कारवाई सुरू केली आहे. ‘एनआयए’ आणि ‘एटीएस’च्या पथकांनी आज पहाटे देशातील 44 ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, भिवंडी तालुक्यातील पडघा बोरिवली येथे ही पथके धडकली आणि 15 जणांना अटक केली.
तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱया इसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी जुलै महिन्यात मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ मटका ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी ऊर्फ आदिल ऊर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्य प्रदेश) यांना अटक केली होती. आज त्यांचे साथीदार कादीर दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ सईफ, साकीब नाचन, आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे) यांना ‘एनआयए’ने अटक केली.
कोंढव्यातील दोघांची कसून चौकशी; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त
‘एनआयए’च्या पथकांनी पुणे, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, दिल्लीत छापे टाकले आहेत. पथकाने कोंढव्यातील शोएब अली शेख (रा. इसेन्सिया सोसायटी, कोंढवा; मूळ रा. कल्याण कोळसेवाडी) आणि अन्वर अली जावेद अली खान (रा. कोंढवा) यांच्याकडे कसून चौकशी केली आहे. त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज जप्त केले असून तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.
दहशतवादी कारवायांसाठी काsंढव्यात प्रशिक्षण
इसिसचे जाळे महाराष्ट्र, तेलंगणा, गोव्यात पसरविण्याची जबाबदारी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे होती. पुणे पोलिसांनी दहशतवाद्यांकडून पिस्तुले, स्पह्टके जप्त केली होती. दहशतवादी कारवायांसाठी कोंढव्यात प्रशिक्षण दिले होते. तसेच बॉम्बस्पह्ट घडविल्यानंतर अटक टाळण्यासाठी दुर्गम भागात लपण्याची जागाही शोधली होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
राबोडीतील अंजूम बापेची चौकशी
राबोडीतील चांदिवाला अपार्टमेंट येथे राहणाऱया अंजूम बापे याच्या घरावरही एनआयएने छापेमारी केली. त्याची चार तास चौकशी करून कागदपत्रांची तपासणीही केली. अंजूमच्या मोबाईलमधून काही अधिक माहिती मिळण्याच्या संशयावरून एनआयएने त्याचा मोबाईल जप्त केला आहे. अंजूम बापे हा वास्तुविशारद असून त्याने काढलेले अनेक नकाशे, ड्रॉइंग एनआयएच्या पथकाने तपासले, परंतु त्यांना काही आक्षेपार्ह आढळले नाही. मात्र अंजूमला एनआयएने नोटीस बजावली आहे.
फर्ग्युसन रस्ता रडारवर
पुण्यात गर्दीच्या ठिकाणांना दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते. त्यासाठी त्यांनी फर्ग्युसन रस्त्याची रेकी केली होती. हा रस्ता दहशतवाद्यांच्या रडारवर होता. तसेच पुण्यात महत्त्वाच्या लष्करी संस्था आहेत. या संस्थांच्या परिसराचे ड्रोन कॅमेऱयाद्वारे चित्रीकरण केले होते, अशीही माहिती आहे.
साकीब नाचन मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी
साकिब नाचन हा 2003 च्या मुंबई बॉम्बस्पह्ट प्रकरणातील आरोपी असून इतर दहशतवादी कारवायांतही तो अनेक वर्षे अटकेत होता. त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर तो पडघ्याच्या बोरिवली गावात राहत होता. त्याचा इसिस या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याचा ‘एनआयए’ला संशय असल्याने त्याला आज ताब्यात घेण्यात आले. त्याचा मुलगा आतिफ नाचन यालाही एनआयएने पुण्यातील ‘इसिस मोडय़ुल’ प्रकरणात ऑगस्ट महिन्यात अटक केली होती. यापूर्वी पडघा बोरिवली येथून 3 जुलै रोजी जुल्फिकार बडोदावाला, शार्जिल शेख व 5 ऑगस्ट रोजी आतिफ नाचन याला अटक केली होती.
मीरा रोडच्या रिझवान सय्यदची झाडाझडती
मीरा रोडच्या नयानगर परिसरात लक्ष्मी पार्क कॉम्प्लेक्सच्या आविष्कार इमारतीत राहणाऱया रिझवान सय्यद याच्या घरीही सकाळी 8.30 वाजता एनआयएचे अधिकारी दाखल झाले. रिझवान हा खासगी ऑनलाइन जाहिरात पंपनीत काम करतो. एनआयएच्या पथकाने रिझवानची कसून चौकशी करत घराची झाडाझडती घेतली. सोमवारी एनआयए कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावत एनआयएच्या अधिकाऱयांनी रिझवान सय्यदचे दोन्ही मोबाईल ताब्यात घेतले.
पुण्यातून पकडलेल्या दहशतवाद्यांनी तोंड उघडले
– पुण्यातील कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आमल यांना जुलैमध्ये पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत ते दहशतवादी असल्याचे उघडकीस आले.
– पोलिसांनी कोंढव्यात आरोपी साकी, खान, आमल वास्तव्याला असताना त्यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्यांचा ‘अल सुफा’ दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे उघडकीस आले होते.
– त्यानंतर हा तपास ‘एनआयए’कडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणी पुण्यातून पकडलेल्या दहशतवाद्यांनी तोंड उघडल्यानंतर ‘एनआयए’ने देशभरातून विविध ठिकाणांहून संशयितांची धरपकड केली.
– पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांवर राजस्थानात चित्तौड परिसरात स्फोटके बाळगल्याचा गुन्हा दाखल होता. तेव्हापासून ते पसार झाले होते. तपासात तिघेही दहशतवादी ‘इसिस’च्या संपका&त असल्याचे उघडकीस आले होते.

























































