आरोग्य खात्यावर डॉक्टरांच्या अर्जांचा पाऊस; वेबसाईट कोलमडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राज्यातल्या शासकीय रुग्णालयात आयुर्वेद डॉक्टरांसाठी (बीएएमएस) गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच कायमस्वरूपी नोकरीची दारे उघडली आहेत. त्यामुळे बीएएमएसच्या फक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होताच राज्याच्या सर्वच भागातील डॉक्टरांनी सरकारी नोकरीसाठी अर्जांचा केल्याने अठरा दिवसांत सुमारे 23 हजार अर्जांचा पाऊस पडला. या अर्जांमुळे तर आरोग्य खात्याची वेबसाईटच कोलमडली होती.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एमबीबीएस डॉक्टरांच्या 1 हजार 446 पदांसाठी आणि बीएएमएस म्हणजे आयुर्वेद डॉक्टरांच्या 283 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. 1 ते 15 फेब्रुवारी अशी अर्ज सादर करण्याची मुदत होती, पण आयुर्वेद डॉक्टरांची गेल्या अनेक वर्षांपासून भरती झाली नव्हती. त्यामुळे अर्जांचा पाऊस पडला.