पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचेच; विधानसभेत 24 जागा राखीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकव्याप्त कश्मीर  (पीओके) आपलेच हिंदुस्थानचे आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीर विधानसभेत ‘पीओके’साठी 24 जागा राखीव ठेवल्या आहेत, अशी माहिती आज पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

लोकसभेत ‘जम्मू-कश्मीर पुनर्गठण विधेयक’ आणि ‘जम्मू-कश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक’ हे दोन विधेयक सरकारने मांडली. यावर चर्चा झाली आणि विधेयके मंजूर करण्यात आली. चर्चेला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, जम्मू-कश्मीरच्या विधानसभेतील जागांचे पुनर्गठण करण्यात आले आहे.

असे आहे जागांचे पुनर्गठण

  • जम्मू-कश्मीर विधानसभेच्या पूर्वी 107 जागा होत्या, आता 114 झाल्या आहेत.
  • जम्मू विभागात 37 जागा होत्या, त्या 43 करण्यात आल्या. काश्मीर खोऱ्यात 46 जागा होत्या, आता 47 जागा झाल्या. यात 24 जागा पाकव्याप्त कश्मीरसाठी राखीव ठेवल्या आहेत.
  • जम्मू-कश्मीर विधानसभेत दोन सदस्य नामनिर्देशित केले जात होते. आता तीनने वाढ केली आहे. आता पाच सदस्यांना नामनिर्देशित केले जाईल.
  • विस्थापित कश्मिरींसाठी विधानसभेत तीन जागा राखीव ठेवल्या असून, एक महिला प्रतिनिधी असणार आहे.

75 वर्षांनंतरही टीका नेहरूंवरच, अमित शहा यांच्या विधानावरून लोकसभेत गदारोळ

पाकिस्तानविरोधात तीन युद्धे झाले. या युद्धात हजारो लोक विस्थापित झाले. तसेच पाकव्याप्त कश्मीरमधून 46 हजार 631 कुटुंब आणि 1,57,938 लोक विस्थापित झाले. जम्मू-कश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयकामुळे विस्थापितांना न्याय मिळेल, असे शहा यांनी सांगितले.