
बेरोजगारी आणि कर्जबाजारीमुळे गेल्या तीन कर्षात 25 हजारांहून अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. यातील कोरोना काळात 8761 जणांनी जीव गमावला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या हवाल्याने ही माहिती राज्यसभेत दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजेच 2020 मध्ये बेरोजगारीमुळे 3548 जणांनी आणि कर्जबाजारीपणामुळे 5213 जणांनी अशा 8761 जणांनी जीवनयात्रा संपवली अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
संसदेत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बेरोजगारी, महागाई आणि कर्जबाजारीपणाचा मुद्दा विरोधकांनी लाकून धरला होता. संसदेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले, 2018 ते 2020 या कालावधीत बेरोजगारीमुळे 9140 जणांनी आयुष्य संपवले आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 3548 आत्महत्या कोरोनाकाळात झाल्या आहेत. 2018 मध्ये 2741 तर 2019 साली 2851 जणांनी आत्महत्या केली आहे. याच कालाकधीत कर्जबाजारीपणाला कंटाळून 16 हजार 91 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी 2018 साली 4970 तर 2019 साली 5908 जणांनी आत्महत्या केली आहे. हीच आकडेकारी 2020 साली 5213 इतकी होती, अशी माहिती संसदेत देण्यात आली आहे.
























































