
सामना ऑनलाईन प्रतिनिधी
संभाजीनगर मराठकाडा विभागातील शेतकरी दुष्काळ, अतिकृष्टी, घेतलेल्या पिकांकर रोगाचा प्रादुर्भाव, त्यातच कर्जमाफीला झालेला विलंब अशा अनेकविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळेच साडेपाच महिन्यांत विभागातील ४५२ शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली. आत्महत्येच्या घटना दिवसागणित वाढत आहेत.
आत्महत्या केलेल्या ४५२ प्रकरणांपैकी सरकार दरबारी २०९ शेतकरी आत्महत्या शासन मदतीस पात्र ठरल्या असून १०१ अपात्र ठरकिण्यात आल्या आहेत. शेतकऱ्याच्या कारसांना तातडीने आर्थिक मदत केली जाते, असा दाका सरकार करीत असले तरी सरकारचा हा दावा पोकळ आहे. ही १२३ आत्महत्येची प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवल्याने स्पष्ट होत आहे. विभागात सर्वाधिक बीड जिह्यात ८१ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. संभाजीनगर – ६७, धाराशिवमध्ये ६४, परभणी – ५५, जालना – ५३, नांदेड – ४०, लातूर – ४२, हिंगोली – ३१ अशा एकूण ४५२ शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत.

































































