आयुष फाळके विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

49वी राज्य ज्युडो चॅम्पियनशिप आणि नॅशनल चॅम्पियन ट्रायल स्पर्धेत 73 किलो वजनी गटात मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा आयुष फाळके यांनी  सलग 5 फेऱया जिंकून कोल्हापुरात मुंबईचा झेंडा फडकावला. तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.

आयुष हा खालसा कॉलेजला बीएमएसच्या दुसऱया वर्षात शिकत असून दादरच्या समर्थ व्यायाम मंदिर येथे प्रशिक्षक इंटरनॅशनल ज्युडो रेफ्री रवीन्द्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे. आता पुढील आठवडय़ात रांची येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेत आयुष फाळके हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्र ज्युडोचे अध्यक्ष धनंजय भोसले यांनी आयुषला सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले.

क्रिया शहाला सुवर्ण

ठाणेकर आर्टिस्टिक जिम्नॅस्ट क्रिशा जतीन शहाने इजिप्तची राजधानी पैरो येथे झालेल्या फहारोझ कप आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. प्री ज्युनियर गटासाठी जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या या स्पर्धेत क्रिशा टेबलव्हॉल्ट प्रकारात अव्वल आली. तिने 11.850 गुणांची कमाई करताना सुकारा प्रकाराचे (हवेत कोलांटी उडय़ा मारून कुठलीही चूक न करता जमिनीवर पाय टेकवले जातात) अचूक सादरीकरण करत इतर स्पर्धकांना मागे टाकले.