दिल्लीनंतर झारखंडमध्ये प्रियकराकडून प्रेयसीचे 50 तुकडे, साहेबगंजच्या दिलदार अन्सारीने रिबिकाची केली निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीत श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच झारखंडमध्ये या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दिल्लीत आफताबने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले होते, मात्र त्यापेक्षा भयानक कृत्य समोर आले आहे. साहेबगंजमध्ये दिलदार अन्सारीने त्याची मैत्रीण रिबिका पहाडीनचे 50 पेक्षा जास्त तुकडे केले. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून घरात ठेकले होते. त्याने रिबिकाचे काही तुकडे परिसरातील निर्जन ठिकाणी फेकल्याने कुत्र्यांनी ते मांस ओरबाडून खाल्ल्याचे समोर आले. या घटनेनंतर संपूर्ण झारखंडमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक लोकांनी कुत्र्यांना मानकी मांस खाताना पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. संताळी पंचायतीच्या मोमीन टोला येथे ग्रामस्थांना अंगणकाडी केंद्राजकळ मानकी शरीराचे काही तुकडे दिसले. कुत्रे पाय, छाती आणि शरीराच्या इतर भागांना ओरबाडून खात असल्याचे लोकांनी पाहिले. हा मानकी मृतदेह असल्याचा संशय लोकांना आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बोरिओ पोलीस ठाण्याचे प्रभारी जगन्नाथ पान आणि एएसआय करुण कुमार पथकासह घटनास्थळी पोहचले होते.

तरुणीचे शिर अद्याप बेपत्ता असून, मृत तरुणी आदिम पहारिया आदिकासी समाजाची होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने सांगितलेल्या ठिकाणांकरून मृतदेहांचे तुकडे गोळा करणे सुरू आहे. पोलिसांनी मृतदेहाचे काही तुकडे ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी महिलेचा प्रियकर दिलदार अन्सारी याला बेला टोला येथून अटक केली आहे.