विक्रीसाठी नेण्यात येणारा गुटखा जालन्यात पकडला; 51 लाखांचा मुद्देमाल जप्त

550

जालना जिल्ह्यातील गोदी पोलिसांनी अवैधरित्या विक्रीसाठी नेण्यात येणारा सुमारे 51 लाखांचा गुटखा मंगळवारी सकाळी जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे. ज्वारीच्या गोण्यांमागे लपवून गुटखा विक्रीसाठी नेला जात होता. अवैधरित्या विक्रीसाठी नेण्यात येणारा गुटखा जालना जिल्ह्यातील गोदी पोलिसांनी मंगळवारी सकाळी जप्त केला. सोलापूर- संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गहिनीनाथनगरजवळ ही कारवाई करण्यात आली.

बीडहून संभाजीनगरकडे गहिनीनाथनगर मार्गाने जाणाऱ्या ट्रकमध्ये ज्वारीच्या गोण्यांआड गुटखा नेण्यात येत होता. गुटख्याच्या वाहतुकीबाबत गोदी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सकाळी 8 वाजता गहिनीनाथनगरजवळ ही कारवाई केली. गोदी पोलिसांनी सापळा लावून गोवा पर्क 1000 गुटख्याच्या 207 गोण्या जप्त केल्या. हा गुटखा 34 लाख रुपयांचा आहे. 34 लाखांचा गुटखा आणि ट्रकसह एकूण 51 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच ट्रकचालक हनुमान गुरव (रा. पुणे), क्लिनर अख्तर दिलावर शेख (रा. शेवगाव, जि. नगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

कुजलेल्या ज्वारीच्या गोण्या आणि त्यात गुटख्याच्या गोण्या भरुन ट्रकमध्ये टाकण्यात आल्या होता. ज्वारीच्या गोण्यांमागे लपवून गुटख्याची विक्री करण्यासाठी हा गुटखा संभाजीनगरकडे नेण्यात येत होता. मात्र, पोलिसांनी सतर्कतेने ही कारवाई केल्याने मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या