म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी 59,058 अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 59,058 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 48,919 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत 4,640 घरे आणि 14 भूखंडांच्या विक्रीसाठीच्या सोडत अर्ज नोंदणी प्रक्रियेस 8 मार्चपासून सुरुवात झाली होती. 27 एप्रिल रोजी पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. पात्र सहभागींची अंतिम यादी 4 मे रोजी जाहीर केली जाईल. ऑनलाइन संगणकीय असणारी सोडत 10 मे रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात काढण्यात येईल.