झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; ६ पोलीस शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रांची

झारखंडमधील नक्षलग्रस्त लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात सहा पोलीस शहीद झाले आहेत. तर चार पोलीस जखमी झाले आहेत. त्यानंतर सीआरपीएफने राबवलेल्या शोधमोहिमेत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

मंगळवारी झारखंड जगुआरची ११२ बटालियन आणि एसाल्ट ग्रुप ४० शोधमोहीम पूर्ण करून बूढापहाड परिसरातून परतत होती. त्यावेळी गढवा येथील छिंजो भागात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट केला. त्यात सहा पोलीस शहीद झाले. तर चार पोलीस जखमी झाले. त्यानंतर परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रतुत्तर देताच नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. तसेच पोलिसांकडील काही शस्त्र ही त्यांनी पळवून नेली. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर पोलिसांची अतिरक्ति कुमक पलामू, लातेहार, गढवा भागात पाठवण्यात आली आहे. पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवून एका नक्षलवाद्याचा खात्मा केला आहे. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.