सिंगापूरच्या पंतप्रधानांकर टीका; ब्लॉगरला 72 लाखांचा दंड

सिंगापूरचे पंतप्रधान ली हसियन लूंग यांच्याकर टीका करणे, एका ब्लॉगरला महागात पडले आहे. लूंग यांची बदनामी केल्याप्रकरणी हायकोर्टाने ब्लॉगर लियोंग सेज याला एक लाख डॉलरचा (जवळपास 72 लाख रुपये) दंड ठोठावला. पंतप्रधान ली यांचा मलेशियातील मनी लॉण्डरिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. ब्लॉगर हियान याने दंडाची रक्कम जमवण्यासाठी क्राउड फंडिंगची मदत घेतली. लिओंगच्या
वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दंडापेक्षाही थोडी अधिक रक्कम जमा झाली आहे. या क्राउड फंडिंगमध्ये दोन हजार लोकांनी सहभाग घेत आर्थिक मदत केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, टीका करण्याच्या अधिकारासाठी ही मंडळी समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या