विधानसभेत भाजप आमदार रडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

राज्याचे उद्योगमंत्री राजेंद्र शुक्ल हे माझा छळ करतात, असा खळबळजनक आरोप भाजपच्या महिला आमदार नीलम मिश्रा यांनी आज भर विधानसभेत केला. हा आरोप करताना त्या ढसाढसा रडल्या. यामुळे विधानसभेचे वातावरण अचानक गंभीर बनले.

माझा छळ होत असल्याने मला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली. हा आरोप करता करताच नीलम या रडू लागल्याने विधानसभेचे वातावरण गंभीर झाले. यावेळी सभापतींनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर त्यांना खाली बसण्यास सांगितले. पण मला सुरक्षा पुरवा. त्याशिवाय मी खाली बसणार नाही, असे त्यांनी सभापतींना सांगितले. सुरक्षा द्या नाही तर मी आमदारकी सोडेन, असा इशाराही त्यांनी दिला. यानंतर गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी त्यांना सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले. शिवाय प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.