कोकणात पावसाची दिवाळी, अवकाळी बरसल्याने ग्राहकांची तारांबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी/ सिंधुदुर्ग

तळकोकणात रविवारी दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने शनिवारी वर्तवली होती. हा अंदाज तंतोतंत खरा ठरत आज दुपारपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात मुसळधार पाऊस कोसळला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात झुंबड उडाली होती, मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. फटाक्यांचे लावलेले स्टॉल्स भिजू नयेत म्हणून फटाके विक्रेत्यांची धावाधाव सुरू झाली. शेतात कापलेले भात भिजून नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

चिपळूण – परतीच्या पावसानंतर आठवाडाभरात अवकाळी पावसाने चिपळूण शहरासहित ग्रामीण भागाला झोडपले.
देवरूख – गेले दोन दिवस तालुक्यात झालेला पावसाचा शिडकावा, मध्येच असणारे ढगाळ वातावरण आणि वाढलेला उष्मा तर पहाटे पडणारे दाट धुक्याचे अवकाळी संकट हापूसच्या मुळावर येण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
वैभववाडी – सलग दुसऱ्या दिवशी वैभववाडी तालुक्याला विजांच्या कडकडाटासह जोरदार परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

summary- rain at various villages of konkan