दिल्ली हादरली, भररस्त्यात तरुणाला शंभरवेळा भोसकले, डोळेही फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या दिल्लीमध्ये आता तरुणांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. येथील आजादपूरमधील एमसीडी कॉलनीत क्षुल्लकशा भांडणावरून एका टोळक्याने भररस्त्यात एका तरुणावर चाकूहल्ला करत शेकडो वार केले. पण तेवढे करूनही समाधान न झाल्याने या टोळक्याने चाकूने त्याचे डोळेही  फोडल्याची महाभयंकर घटना घडली आहे. शानू (24) असे त्याचे नाव आहे.

मंगळवारी शानूचा काही मुलांबरोबर क्षुल्लकशा गोष्टीवरून वाद झाला. बघता बघता वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर या टोळक्याने शानुला चारही बाजूने घेरले व त्याच्यावर चाकूने हल्ला केला. टोळक्याने त्याला पाठीवर, पोटावर पायावर छातीवर शंभरवेळा भोसकले. शानु रक्ताच्या थारोळ्यात पडला तरीही नराधम त्याला भोसकत होते. त्यांनी चाकूने त्याचे डोळेही फोडले त्यानंतर टोळक्याने तिथून पळ काढला. नंतर तिथे असेलल्या नागरिकांनी शानूला रुग्णालायत दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, शानूची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यातील वादातून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली असावी असे पोलिसांनी म्हटले आहे.
.