
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर यावर्षी होळीच्या सणानिमित्त पाकिस्तानला मिठाई न देण्याचा निर्णय बीएसएफने घेतला आहे.
साधारणत: होळी, दिवाळी व इतर सणांच्या निमित्ताने दोन्ही देश एकमेकांना मिठाई देऊन आनंद साजरा करतात. पण यावर्षी बीएसएफने पाकिस्तानला मिठाई न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरमहिन्याला पाकिस्तानी सैनिकांबरोबर होणारी कमांडंट बैठकही रद्द करण्यात आली आहे.

























































