Exclusive बँक चोरीतील चोरट्यांची छायाचित्र ‘सामना’च्या हाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pandharpur-robbery

>> सुनिल उंबरे । पंढरपूर

पंढरपूर येथील स्टेट बँकच्या शाखेमध्ये मंगळवारी झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे फोटो ‘सामना’च्या हाती लागले आहेत. या चोरीचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून या फोटोतील चोरटे आढळून आल्यास पंढरपूर पोलीस अथवा आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन पंढरपूर शहर पोलिसांनी केले आहे.

चोरी करणारे चारही चोरटे हे 25 ते 30 वयोगतील दिसत आहेत. फॉर्मल कपडे, कंबरेला ओळखपत्र लावले असल्याने पाहता क्षणी हे या बँकेचे कर्मचारी आहेत की काय असा भास होईल, असा पेहराव चोरट्यांनी केला होता.

बँकेचे कामकाज सुरू असताना शंभरहून अधिक लोकांच्या समोर या चोरट्यांनी सर्वांची नजर चुकवून 9 लाख 25 हजाराची बॅग हातोहात लांबवली. बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे माहीत असताना देखील चोरट्यांनी चेहरा उघडा ठेवून आपले काम साध्य केले. सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.