
कोकण रेल्वे मार्गावर 26 सप्टेंबरपासून मध्यरेल्वेच्या सहकार्याने दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस गाडी धावणार आहे. ही गाडी 19 डब्यांची असणार आहे.
गाडी क्र.01003 दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ही गाडी 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान रात्री बारा वाजून पाच मिनीटांनी सुटेल आणि दुसर्या दिवशी सावंतवाडीला बारा वाजून वीस मिनीटांनी पोहोचेल़. गाडी क्र.01004 सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्स्प्रेस ही गाडी 26 सप्टेंबरपासून सावंतवाडी रोड येथून सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनीटांनी दादरला पोहोचेल. 1 नोव्हेंबरनंतर गाडीच्या वेळापत्रकात बदल होईल. 1 नोव्हेंबरला ही गाडी दादरवरुन रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी सुटेल. दुसर्या दिवशी सकाळी 10 वाजून पाच मिनीटांनी सावंतवाडीला पोहोचेल. सावंतवाडीहून ही गाडी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनीटांनी सुटेल आणि दादरला सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनीटांनी पोहोचेल. या गाडीमध्ये टू टायर एसीचा एक डबा, थ्री टायर एसीचे 4 डबे, स्लीपरचे 8 डबे, जनरलचे 4 आणि एसएलआरचे 2 डबे असतील.

























































