
बॉलिवूड दिग्दर्शक आदित्य धर याच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ चित्रपट जाहीर झाल्यापासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कोण असेल, याचीही माहिती आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात विकी सोबतच अभिनेत्री सारा अली खान जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात ती विकीच्या अपोझिट भूमिकेत दिसणार आहे. असे असले तरी याबाबत अद्याप कोणतीही ऑफिशियल घोषणा करण्यात आलेली नाही आहे.
पीपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, सारा अली खानने या चित्रपटात काम सुरु केले आहे. या चित्रपटात ती भरपूर एक्शन करताना दिसणार आहे. दरम्यान ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ हा चित्रपट महाभारतातील एका पात्रावर आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट सायन्स फिक्शन आणि थ्रिलर आहे. यापूर्वी विकीने या चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले होते.
Overwhelmed and ecstatic !
On the 2nd anniversary of ‘URI-The Surgical Strike’ , the team gives you a glimpse into the world of #TheImmortalAshwatthama
Cannot wait to get onto this journey with the dream team of @AdityaDharFilms @RonnieScrewvala @RSVPMovies @soniakanwar22 pic.twitter.com/tYOVQ4FG1P— Vicky Kaushal (@vickykaushal09) January 11, 2021



























































