
कोरोनाच्या काळातही वैद्यकीय उपकरणे चोरीची आणखी एक घटना नुकतीच समोर आली आहे. अहमदाबादच्या घाटलोडिया परिसरातील शहर आरोग्य केंद्रातून ( UHC अर्बन हेल्थ सेंटर) रॅपिड अँटीजेन टेस्ट किट चोरीस गेले आहेत. या आरोग्य केंद्रातून 6.27 लाख रुपयांच्या एकूण 16 पेट्या चोरी झाल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर 21 वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. हा MBBS चा विद्यार्थी ज्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
UHC मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. पवन पटेल यांनी तक्रार दिली. या तक्रारीत म्हटले आहे की वैद्यकीय साहित्याची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना बुधवारी माहिती दिली की, UHC च्या कक्ष क्र. 9 मध्ये एक अज्ञात व्यक्ती फिरताना आढळला आणि त्याच्या हातात एक प्लास्टिक पिशवी होती ज्यामध्ये टेस्ट किटच्या पेट्या घेऊन पळ काढला.
कर्मचाऱ्यांना त्याची शंका आली म्हणून ते त्याच्यामागे गेले. तो विद्यार्थी एका गाडीत बसला. या गाडीत आणखी एक माणूस असल्याचेही त्यांना दिसले. त्यांनी पटेल यांना माहिती दिली. पटेल यांनी इतर केंद्रांना चौकशी केली की, त्यांनी कुणाला कीट घेण्यासाठी म्हणून पाठवले होते का? त्यानंतर त्यांनी तक्रार दिली. चौकशी दरम्यान स्पष्ट झाले की, या आरोपीचे नाव अनिल जेठवा असे आहे.
पोलिसांनी सांगितले की, जेठवा याने चोरी केल्याचे कबूल केले. मात्र चोरीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत. अहमदाबाद मिररने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.




























































