लहान मुलांवर होणार ऑनलाईन ‘संस्कार’, केंद्र सरकार आणणार देवदेवता आणि महापुरुषांवर आधारीत ‘गेम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारने देशात ‘पब्जी’वर बंदी घातली खरी, परंतु अजूनही हिंदुस्थानात खेळल्या जाणाऱया ऑनलाईन गेम्सपैकी 98 टक्के गेम्स विदेशीच आहेत. लहान मुलांवरील या गेम्सची जादू हटवण्यासाठी केंद्र सरकारने आता स्वदेशी संस्कारी गेम विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदी महापुरुषांचे संस्कार शिकवले जाणार आहेत.

विदेशी ऑनलाईन गेम्स लहान मुलांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम करीत आहेत. या गेम्सना वेळीच रोखण्याची नितांत गरज बनली आहे. याच अनुषंगाने सरकारने स्वदेशी संस्कारी गेम विकसित करण्याचे पाऊल टाकले आहे. स्वदेशी गेम देव-देवता व महापुरुषांवर आधारित असतील. यासंदर्भात डॉ. पराग मनकीकर यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने केंद्र सरकारला विविध शिफारशी केल्या आहेत. समितीने ऑनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्ससाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सीलेंन्स खोलण्याची ‘ब्लू प्रिंट’ सरकारला दिली आहे. स्वदेशी संस्कारी गेमची योजना जुलै-ऑगस्टपर्यंत साकार होईल, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी सांगितले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सेंटर ऑफ एक्सीलेन्स स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.

‘पॉझिटिव्हिटी मार्केट’मध्ये हिंदुस्थान विश्वगुरू बनणार

कोरोना महामारीमुळे जगभर नैराश्येचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांना दया, सद्भावना, सकारात्मक विचार आणि वेळेचा सदुपयोग या गोष्टींचे महत्त्व कळले आहे. आरोग्य, ध्यान आणि प्राणायाम यांसारखे उपाय व बालमनोरंजनासाठी हिंदुस्थानकडे पुरेसे मनुष्यबळ आहे. कोरोना काळात ‘पॉझिटिव्हिटी मार्पेट’ने उसळी घेतली आहे. या मार्पेटमध्ये हिंदुस्थानला विश्वगुरु बनवण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे.
n विदेशी गुंतवणूकदारांचा हिंसा आणि शस्त्रास्त्रांसंबंधी ऑनलाईन गेम्सवर भर आहे. या गेम्सच्या व्यवसायाची उलाढाल 14.6 लाख कोटींची आहे. मात्र सध्याच्या घडीला शिक्षण, टूरिझम, व्यवसाय, मॅनेजमेंट मिलिट्री स्किल्सच्या गेम्सचा ट्रेंड वाढत आहे. या गेम्सचे मार्पेट 50 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे.

केंद्राच्या समितीने केलेल्या शिफारशी
ऑनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग व कॉमिक्स (एव्हीजीसी) प्रशिक्षण
एव्हीजीसी संशोधन व विकास
एव्हीजीसी प्रकल्प निर्माण
एव्हीजीसी स्टार्टअप