
खगोल शास्त्रज्ञांना आकाशगंगेत राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण सापडले आहे. पृथ्वीला पर्याय म्हणून या जागेचा विचार करता येईल का यादृष्टीने अधिक संशोधन सुरू आहे.
याबाबतचे संशोधन इटलीच्या इन्सुब्रिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. रिकॉर्डो स्पिनेली हे या टीमचे प्रमुख होते. स्पिनेली यांच्या टीमने दोन गोष्टी शोधल्या आहेत. आकाशगंगेतील सर्वात सुरक्षित आणि धोकादायक स्थान. या संशोधनात 1,100 कोटी वर्षांचा इतिहास सापडला. ज्यामध्ये असे आढळले की, आपण आकाशगंगेमध्ये राहतो ते ठिकाण सर्वात सुरक्षित पट्टय़ात आहे. लाखो वर्षांपूर्वी आकाशगंगेच्या निर्मितीच्या वेळी तिचे सर्वात सुरक्षित स्थान म्हणजे त्याचे शेवटचे टोक होते.
अंतराळामधील स्फोटामुळे आकाशगंगेतील जीवांचा विकास होत नाही, असे संशोधनकांना सांगितले आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, 45 कोटी वर्षांपूर्वी अंतराळात ओर्डोविसियिन नावाचा एक ग्रह होता, ज्याला दुसरी पृथ्वी म्हणून ओळखले जात असे. या ग्रहावरील वस्तुमान विलुप्त होण्यामुळे गामा किरणांचा स्फोट झाला. उर्वरित भाग आता आकाशगंगेमध्ये सापडले आहेत. पृथ्वी या सर्व धोक्यांपासून वाचली आहे.




























































