कांगारूंचाच संघ ‘लय भारी’; 5 वनडे विश्वचषक, 2 चॅम्पियन्स ट्रॉफी जेतीपदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडिज संघाचा झंझावाती दबदबा कमी झाल्यावर ऑस्ट्रेलियन संघाने 1990 आणि 2000 या दशकात क्रिकेटजगतात आपल्या तुफानी खेळाची प्रभावी मोहोर उमटवली. गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियन संघाने आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांत जोरदार खेळ करीत 5 एकदिवसीय विश्वचषक आणि 2 चॅम्पियन्स ट्रॉफी जेतीपदे पटकावली आहेत. सलग तीन वेळा वन डे विश्वचषक जिंकण्याचा कांगारूंचा विश्वविक्रम अद्याप जगातील कोणताही संघ मोडू शकलेला नाही. क्रिकेट जगतात ‘लय भारी’ ही आपली प्रतिमा अद्याप ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने जपली आहे. टी-20 विश्वचषक विजेतेपदासाठी मात्र कांगारूंना तब्बल 14 वर्षे प्रतीक्षा करावी लागली आहे.

1990 ते 2000 या दशकात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे नाव घेतले तरी प्रतिस्पर्धी संघांची पाचावर धारण बसायची. इतका कांगारूंचा खेळ तुफानी होता. 1999, 2003 आणि 2007  मध्ये संघाने विश्वचषक जिंकण्याची हॅटdिट्रक केली. टी-20  फॉरमॅटने क्रिकेटच्या विश्वात प्रवेश केला तेव्हाही चाहत्यांनी कांगारूंच्या  संघाकडे सुरुवातीपासूनच चॅम्पियन म्हणून पाहण्यास सुरुवात केली. मात्र, 14 वर्षानंतर दुबईतील टी-20 विश्व चषक जिंपून कांगारूनी आपणच क्रिकेटचे खरे विश्वविजेते असल्याचे सिद्ध केले आहे.

सात वन डे विश्वचषक फायनलपैकी 5 जिंकल्या

ऑस्ट्रेलियाचा संघ एकही टी-20 विश्वचषक जिंपू शकला नसला, तरी सर्वाधिक एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम या संघाच्या नावावर आहे. कांगारू संघाने 1987 मध्ये अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर 1999 मध्ये स्टीव्ह वॉ, 2003 -2007  मध्ये रिकी पाँटिंग आणि 2015 मध्ये मायकेल क्लार्पने टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवले. ऑस्ट्रेलिया संघाने एपूण 7 विश्वचषक फायनल खेळले आणि पाचमध्ये विजेतेपद पटकावले.