
किरीट सोमय्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याला मी बांधील नाही. सोमय्या म्हणजे कुठली एजन्सी नाही. त्यांनी ज्या एजन्सीकडे तक्रारी केल्या आहेत. त्या एजन्सीकडून मला प्रश्न विचारले गेल्यास मी उत्तर देईल. आतापर्यंत उत्तरे दिली असून, यापुढेही उत्तरे द्यायला तयार आहे, असे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोमय्यांबाबत त्यांना विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

























































