न्यायालयाचा निकाल OBC च्या बाजूनेच लागेल, छगन भुजबळ यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chhagan-bhujbal

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत व्यक्त केला. तसेच आपल्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहावे लागेल. या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या असून नगर परिषद, नगरपालिका निवडणुकांवरच आमदार, खासदार देखील निवडून येत असतात, असेही ते म्हणाले.

आता आपण विरोधात आहोत. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याविरोधात आपण ठामपणे उभे राहायला हवे. ‘गलत का विरोध खुलकर किजीए, राजनीति हो या समाजनीति, इतिहास विरोध करनेवालों का लिखा जाता है, तलवे चाटनेवालों का नही’ असे प्रतिपादन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविताना केले.