Sushmita Sen Lalit Modi ट्रोलर्सला कळाला मोदीच्या प्रेमात पडलेल्या सुष्मिताचा ‘खरा’ प्लॅन ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ललित मोदी व सुष्मिता सेनच्या अफेयरच्या चर्चांनी सध्या खळबळ माजवली आहे. या दोघांना त्यांच्या नात्यावरून नेटकरी ट्रोल करत आहेत. सुष्मिता हिने आधी स्वत: पेक्षा लहान रोहमन शॉलला डेट केले. आणि आता ती स्वत: पेक्षा दहा वर्षांनी मोठ्या ललित मोदीच्या प्रेमात पडली आहे. यावरून नेटकरी सध्या त्यांची खिल्ली उडवत असून काहींनी तर तिच्या या प्रेमसंबंधांबाबत अजबच तर्क लावले आहेत.

ललित मोदी हा आयपीएलमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करून हिंदुस्थानातून फरार झाला आहे. हिंदुस्थानात एवढा मोठा घोटाळा करून तो लंडनमध्ये ऐशोआरामाचे जीवन जगत आहेत. त्य़ाच्य़ाकडे अनेक आलिशान व महागड्या गाड्या आहेत. आयपीएल घोटाळ्याप्रकरणी ललित मोदीच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थान गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहे.

ललित मोदींनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी या दोघांना जबरदस्त ट्रोल केले आहे. काहींनी त्यांच्या वयावरून तर काहींनी दिसण्यावरून देखील दोघांवर निशाणा साधला आहे. काही नेटकऱ्यांनी तर चक्क सुष्मिता फरार ललित मोदीला हिंदुस्थानात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी सुष्मिताला हेर बनवून हिंदुस्थानी सरकारनेच ललितच्या आयुष्यात पाठवले असल्याचे म्हणत त्या दोघांची खिल्ली उडवली आहे.