नगराध्यक्ष, सरपंचच कशाला, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही जनतेतून करा!, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला, तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच करा,’ असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर केला. अजित पवार म्हणाले, ‘बहुमत ज्या पक्षाला असते, त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवितात. राज्यातही 145 आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री होतात. त्याच पद्धतीने नगराध्यक्ष व सरपंचपद निवडले गेले असते तर बरे झाले असते. सरपंच व नगराध्यक्ष इतर विचारांचे असतील, तर काय होते, याचा अनुभव यापूर्वी घेतला आहे. अधिकाराचे केंद्रीकरण ही बाब लोकशाहीला घातक आहे. विधिमंडळात हा मुद्दा मांडून चर्चा करून ज्या सूचना येतील, त्यांचा विचार करून मगच हा निर्णय घ्यायला हवा होता.