
रत्नागिरी जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतीमध्ये आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरूवात झाली आहे. सरपंच पदासाठी 406 उमेदवार तर सदस्यपदासाठी 1206 उमेदवार रिंगणात असून, 507 मतदान केंद्रावर 2 लाख 15 हजार 45 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1 लाख 12 हजार 425 महिला तर 1 लाख 2 हजार 520 पुरूष मतदार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहिर झाल्या होत्या. त्यापैकी 67 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आहे. 222 पैकी 59 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच पदासाठी 625 अर्ज आले होते, त्यापैकी 162 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. आता रिंगणात 406 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. 67 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

























































