
अभिनेते किरण माने यांना अनेक मालिका, नाटपं, चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आपण पाहिले आहे. बिग बॉस मराठी 4 सीझनमध्ये त्यांनी जबरदस्त खेळ करत टॉप 5 मध्ये आपले स्थान निर्माण केले. किरण माने आता लवकरच ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहेत.
‘रावरंभा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. गेली अनेक दिवस या चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटातील व्यक्तिरेखांचे लूक समोर येत आहेत. नुकतेच माने यांनी सोशल मीडियावर एक पह्टो पोस्ट करत ‘रावरंभा’मधील फर्स्ट लूक शेअर केला. ‘रावरंभा’ या चित्रपटात किरण माने स्वराज्याचे हेर ‘हकीम चाचा’ ही भूमिका साकारत आहेत.
मानेंचा हकीम चाचा लूक चाहत्यांना फार आवडला आहे. चाहत्यांनी पोस्टवर मोठय़ा प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. ‘रावरंभा’ 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात ओम भूतकर, अपूर्वा नेमळेकर, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर हे महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. अभिनेता शंतनू मोघे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.




























































