शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिशिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे साडेतीनशे कर्मचारी दिनांक 25 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जात आहेत. विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उचलल्याने काम बंद आंदोलनामुळे मंदिर प्रशासनातील कामकाज ठप्प होणार आहे. दरम्यान सर्व कर्मचारी संपावर ठाम असल्याने याच दिवशी सोमवारी निवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व कर्मचारी विविध मागण्यासाठी मोर्चाने धडकणार आहेत.

शनिशिंगणापूर येथील देवस्थान कर्मचाऱ्यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी सीआयटी नाशिक येथील कर्मचारी युनियन संलग्न युनियन स्थापना केली. या संघटनेमार्फत युनियनचे उपाध्यक्ष डॉक्टर डी.एल.कराड यांच्या उपस्थित युनियनच्या मागण्यासाठी देवस्थानचे पदाधिकारी यांचे बैठक पार पडली . बैठकीत तोडगा निघू शकला नाही . त्यावर कर्मचाऱ्यांनी देवस्थानचे प्रशासनाकडे मागील नोव्हेंबरमध्ये लेखी विविध मागण्याचे निवेदन दिले. मात्र देवस्थान प्रशासन या कर्मचाऱ्या मागण्या धूडकावून लावल्या.

या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी अखेर बेमुदत संपाचं हत्यार उपसल्याने येथील कामकाज ठप्प होणार आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. अनुकंपा तत्वावर वारसास नोकरी मिळण्यात यावी. वेतनश्रेणीनुसार 2003 ते 2023 फरक अदा करावा. निवृत्तीचे वय 58 वरून 60 करावे कर्मचाऱ्यांचे अनुभव शैक्षणिक पात्रतेनुसार हुदा पदनिश्चिती लागू करावी. कर्मचाऱ्यांना व कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य सेवा मोफत मिळावे. अशा विविध मागण्यासाठी दिनांक 25 डिसेंबर पासून मंदिरातील जवळपास साडेतीनशे कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत याच दिवशी नगर येथील निवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व कर्मचारी मोर्चा करणार असून महा मुक्काम करण्याचे पत्र देवस्थान युनियन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर रामदास शिंदे उपाध्यक्ष अनिल सोपान शेटे यांनी दिली. साडेतीनशे ते चारशे एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच विविध मागण्यासाठी संपाची हाक दिल्याने येथील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या मागण्याचे गंभीर्यपूर्वक विचार करून मार्ग काढण्यात प्रयत्न सुरू आहे. दोन दिवसात मार्ग काढू असे शनेश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले.