
देशात सध्या चर्चा सुरू आहे ती राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळ्याची. या सोहळ्याच्या निमंत्रण आणि तिथल्या उपस्थिती-अनुपस्थितीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर कार्यक्रमावेळी उपस्थिती राहू शकणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
तृणमूलने अधिकृतपणे आपला निर्णय जाहीर केला नसला तरी, ममता बॅनर्जींच्या पक्षातील सूत्रांनी सांगितले की पक्ष सत्ताधारी भाजपच्या राजकीय जाळ्यात ओढला जाण्यापासून सावध आहे. त्यांचा विश्वास आहे की भाजप 2024 च्या लोकसभा प्रचारासाठी राम मंदिर उद्घाटनाचा फायदा घेऊ पाहत आहे. मात्र तृणमूल यापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
राम मंदिर ट्रस्टने समारंभासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख विरोधी पक्षांना निमंत्रण दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त समोर आलं आहे.

























































