
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होळीनिमित्त मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल-मडगावदरम्यान आणखी दोन अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
पनवेल-मडगाव-पनवेल विशेष गाडी क्र. 01105 गुरुवारी 5 मार्च 2026 (गुरुवार) रोजी सकाळी 05.45 वाजता पनवेलहून निघेल आणि त्याच दिवशी 18.10 वाजता मडगावला पोहोचेल. गाडी क्र. 01106 बुधवारी 4 मार्च 2026 रोजी 16.30 वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी 04.00 वाजता पनवेलला पोहोचेल.
या विशेष गाड्यांना पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल.
























































