IPL 2026 – पराभवाचा चौकार; पंजाब किंग्जचा मुंबईवर 7 विकेटने दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई इंडियन्सने आपली पराभवाची मालिका कायम ठेवत पराभवाचा चौकार लगवाल आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज मात्र विजयाच्या लयीत दिसत आहे. आयपीएल 2026 मधील 24व्या सामन्यात पंजाबने मुंबईचा 7 विकेट्सनी एकतर्फी पराभव केला. मुंबईने 195 धावांचा मोठा डोंगर पंजाब समोर उभा केला होता, तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. मुंबईकडून डि कॉक याने 60 चेंडूत 112 धावांची दमदार शतकी खेळी केली, पण त्याची ही खेळी व्यर्थ ठरली.

पंजाबकडून प्रभासिमरन सिंग याने आक्रमक फलंदाजी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली, तर अर्शदीप सिंग याने गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार श्रेयस अय्यर याने 35 चेंडूत 66 धावांची दमदार खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह पंजाबने 5 पैकी 4 सामने जिंकत आणि एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने 9 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे, तर मुंबईला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.