छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 108 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. छत्तीसगमधील विविध जिल्ह्यांमधील 108 नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांवर एकूण 3.95 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नक्षलवादविरोधी मोहिमेतील सर्वात मोठं यश मानले जात आहे.

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये विजापूरमधील 37 नक्षलवादी, नारायणपूरमधील 4, बस्तरमधील 16, कांकेरमधील 3, सुकमामधील 18 आणि दंतेवाडामधील 30 नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

आत्मसमर्पण केलेल्यांपैकी 22 नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 8 लाख रुपये, 31 नक्षलवाद्यांवर 5 लाख रुपये, 1 नक्षलवाद्यावर 3 लाख रुपये, 9 नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 2 लाख रुपये आणि 43 नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस होते. काही दिवसांपूर्वी, छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात 9 महिला आणि 6 पुरुषांसह 15 माओवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले.